आठवणीतील दिवाळी आणि सुट्टीची धमाल-

दिवाळी जवळ आली की बाबा आणि काका फटाके आणायचे 🎆🧨मग ते आम्हा भावंडांमध्ये समान वाटप केले जायचे. आम्हाला आतुरता आसायची ती आत्या घरी येण्याची. 🙃😊 सगळया छोट्या छोट्या भावांना मनापासुण वाटायचे की आत्या आधि आपाल्या घरी यावी.

लहानपणी दिवाळी ची वेगळीच मजा आसायची.

सकाळी सगळे लवकर उठुन अभ्यंगासाठी नम्बर लावायचे, मी पहीला पेढा,तु दुसरा आणि तो तीसरा हे म्हनायला मजा यायची.बहिण म्हनुण मला सगळया भावांना चोळायला लागायचे आणि त्यात एखादा भाऊ चिडवायचा “ए दीदी जरा जोर लाव ना!!” 😀😀

ज्या घरात आत्या जाई त्या घरात सगळे छोटे सकाळी सकाळी फराळ खायला रेडी.😋

मस्त ताट भरुन भडंग, स्पेशल चकली , करंजी ,शेव असे पदार्थ🍽🧆🥟🥗 आगदी काही मिनिटात फस्त व्हायचे, मग सगळे भाऊ मिळुण फटाके फोडायाचो 👯‍♀️👯‍♂️, टेरेस वर मस्ती आणि दुपारी सगळे झोपले की पार्किंग मध्ये बर्फ पाणी, दोरी च्या उड्या, लोखंड पाणी आणि चोर पोलिस चे डाव रंगायचे, खूप खूप मज्जा यायची.👯‍♂️

आमच्या मोठया आवाजामुळे दुपारची लोकांची झोप मोडायची , ते रागवायचे सुद्धा, रागवणाऱ्या काकु घरात गेल्या की जीभ दाताने दाबुन आणि हासुन पुन्हा हळुच खेळ सुरु करायचा.😇🤣😛😛

संध्याकाळी मस्त चाहा ☕️आणि फराळ खाउन आम्ही मुले परत खेळासाठी सज्य व्हायचो. रात्रि मस्त जेवनानंतर सगळे टेरेस वर सोबत झोपायला जायचे,😴🌌🌛सगळया मुलांची आपली झोपायची जागा पकडण्याची घाई आसायची, कोणालाच कोपऱ्यातली जागा नको आसायची. रात्रि भूत आले तर !!!!👻👻👻 आशी ही रोजची दिनचर्या, हया सगळया गमतीजमती मध्ये दिवाळी ची सुट्टी कधी संपायची हे कळत नव्हते.😎😌आणि राहुन जायचा तो दिवाळी मध्ये दिलेला गृहपाठ.😟🤓 मग शाळा सुरु होण्या आधी तो पटापट करायचा.🤓😎 आता सगळा मित्रवर्ग मोठा झाला, जॉब ला लागले , कहींची लग्न झाली , लाइफ कुठे तरी बीझी झाली राव. 👩‍💼👨‍💼 पण त्या लहानपणी च्या आठवणी आझुन ही ताज्या आहेत. आजकाल सगळे “ मोबाईल “ मध्ये अडकलेले आहेत, खरी आठवणीतील दिवाळी तीच जी आपण लहानपणी केली.

Leave a Comment