दिवाळीत घराघरात कसे वातावरण आसते हया वर आपण अनेक ठिकाणी वाचतो पण दिवाळीत घराबाहेर आंगणात काय सुरु आसते ? ![]()
![]()
जे लोक शहराच्या मध्यवर्ती भागात राहातात ते लोक हया पोस्ट ला निट समजु शकतात.
मध्यवर्ती भागात आगदी एकमेकांच्या गळ्यात गळे घालुण चिकटुन बसलेलि घरे आहेत. आगदी समोरच्या किचन मध्ये काय बनवले हे आपण आपाल्या हॉलमध्ये बसुन गेस करु शकतो.![]()
आसो, आपला विषय आज घराच्या बाहेरचा आहे.
दिवाळी चा दिवस म्हणजे सकाळ पासुन कॉलोनी मधल्या मुली Google चाळत आसतात, माझी रांगोळी बाकी लोकांच्या रांगोळीपेक्षा कशी बेस्ट येईल हया साठी प्रयत्न सुरु आसतात.![]()
![]()
दुपारी आगदी ४ पासुण आंगणात झाडझुड सुरु होते, बरोबर अर्ध्या तासाणे सडा पडतो, त्यातपण लवकर झाडझुड करावी लागते, तुम्ही जरा लेट झालात आणि समोरच्या किंवा शेजारच्या काकूची रांगोळी सुरु झाली की निट झाडता येत नाही कारण त्यांचे अर्धे लक्ष्य तुमच्याकडे आसते
आणि त्या मनात म्हणत आसतात की “बाई ही बया ईतक्या लेट झाडायला आली आता ही झाडताना माझ्या दारात घाण उडायला नको “ पण तोंडावर तरिही गोड स्माइल आसते हां…. ![]()
![]()
![]()
रांगोळी काढुन झाल्यावर आपाली रांगोळी किती छान हयाचा आनंद चेहेऱ्यावर आसतो पण हळुच नजर दुसऱ्यांच्या आंगणात जात आसते, की तीची कशी आहे.
आशी असते रांगोळी ची मजा!!! ![]()
![]()
![]()
![]()
पण खरच सांगते, मोठया मोठया रांगोळया तुम्ही अश्याच आंगन वाल्या घरांमध्ये शिकु शकाता.
स्पर्धे मध्येच आपण शिकतो हे खरे.![]()
![]()