हा विषय तसा खूप मोठा आहे, पण आपण तीतक्या खोलात जाणार नाही आहोत. आपण खूप छोट्या गोष्टी वर सहज चर्चा करुयात.
आजकाल सॉफ्टवेयर कंपनी मध्ये वयाने मोठया असणाऱ्या व्यक्ती, त्यांना एकेरी नावाले हाक मारा असा अट्टाहास धरतात, नवीन व्यक्ती जॉईन झाली की तिला हे आधिच समजावले जाते, की सर मैडम आणि आहो जाहो घालु नको, मला नावाने च बोलव.
सर, मैडम नका बोलु, हे जरा ओके आहे,पण डिरेक्ट एकेरी नाव ? ते ही आपाल्या पेक्षा वयाने खूप मोठया व्यक्तीना ? हे जरा आवघड जाते, मनाला खटकते, हयात आपाल्यावर झालेले संस्कार कुठे तरी मधे येतात. आपण किती ही विदेशी स्टैंडर्ड स्वीकारले असले तरी You म्हणजे तु आणि तुम्ही हे इंग्लिश मध्येच बोलायला छान वाटते. मराठी अथवा हिंदी भाषिक लोक कितिही एकेरी नावाने बोलावले तरी कुठेतरी संस्काराची जान मध्ये येते आणि आपण वळसा “तुम्ही” आणि “आप”कडे घेतो.
आता सवय झाल्यामुळे IT नोकरदार वर्गाला हयाचे फार काही वाटत नाही, पण IT ऑफ़िस च्या बाहेर आजूनही ही भाषा पूर्णपणे चलनात नाही. लोक सर, साहेब अथवा मैडम हे विशेषण लावूण , वयाचा आणि व्यक्ती चा मान ठेउण बोलतात, काही लोक एकेरी नावाने बोलउण घेणे म्हणजे स्टैंडर्ड समजतात आणि तुम्हला त्या साठी खुप फ़ोर्स देखील करतात, तिथे थोडे आवघड जाते खरे पण तिच आपली खरी परीक्षा. स्टैंडर्ड आणि संस्कार हयात स्पर्धा लागते आणि घट्ट मन आसनारे लोक च ती स्पर्धा जिंकतात.
जरा IT बाहेर चे बोलु. मला आठवते, एक काकु मला नेहमी त्यांना नावाणे हाक मार म्हणून माघे लागायच्या, माझे त्यांच्या कडे सतत काही ना काही काम आसायचे, आता आई च्या वयाच्या व्यक्ती ला किती ही मॉडर्न आसो आपण नावाने कशी हाक मारनार? काकु म्हणउन घेने बऱ्याच लोकाना तसे आवडत नाही, मौशि पण ओल्ड स्कूल वाटते मग मी माझ्या मनावर दगड ठेऊण ताई वर सेटलमेंट केली
पण आईसमान व्यक्तीला ताई म्हणने जरा चुक च वाटले, ते ही त्यांना फारसे काही पटले नाही पण नंतर मी जरा अंतर च ठेवले.
असेच काही प्रसंग ऑफ़िस मध्ये सुद्धा मी अनुभवले, तिकडे तुम्हला एकेरी नावच घ्यावे लागते, नो ऑप्शन. पण तिकडे नावाच्या माघे “तुम्ही” किंवा “आप” लावूण आपण सेटलमेंट करु शकतो.
मग चला नेहमी सेटलमेंट करुयात !!! ![]()
टीप- कोणाच्या ही भावनांना दुखापत झाली आसेल तर क्षमस्व!! हे माझे विचार आहेत.
कुचकट कलाश्री