प्रत्येक ठीकाणी इंग्रजी !!!!

चा अट्टाहास का ? 🧐🤔

नमस्कार, आज मी तुम्हाला, मी अनुभवलेल्या काही गमतीदार गोष्टी सांगणार आहे.😜
आपल्याकड़े बरेच लोक इंग्रजी भाषेत बोलणे म्हणजे स्टेटस अथवा स्टैंडर्ड समजतात. 😎 इंग्रजी ही काळाची गरज आहे हे खरे पण ती तिथेच वापरा जीथे ती त्या समुहातिल लोकांना कळते. 🤯🤥😬

एकदा एक काकु आमच्या घरी आल्या, त्या त्यांच्या बरोबर त्यांच्या चिमुकलीला घेऊन आल्या होत्या,छान गप्पा रंगाल्या. 😀 माझी मावशी त्या गोडुलिला म्हणाली, “पिल्लु तु द्राक्ष खाशिल का मी तुझ्या साठी घेऊन येते 🍇, त्या काकू क्षणाचा ही विलंब न करता बोलल्या , “आहो स्वाति ताई, द्राक्ष नाही ग्रेप्स म्हणा, तिला नाही समजनार, 🙄 त्या मग त्यांच्या पिल्लु ला म्हणाल्या, “डू यू वॉंट ग्रेप्स?” गोडुलि काही बोलेना, त्या मावशी ला म्हणाल्या, तिला नको आहेत हो. मावशी स्वयंपाक घरा कडे जाते तोवर गोडुलि म्हनाली “आई मला द्राक्ष पाहिजे”. 😂🙃😬 त्या आगदी कावऱ्या बावऱ्या झाल्या, आता काय बोलावे त्यांना सूचेना, मला जरा हसु च आले पण मी ते दाखवले नाही, मी इंग्रजीमध्ये ते कंट्रोल केले 🤭😂. तशीही मुलांना आई बाबांना तोंडावर पाडायची सवय असतेच.🤥 पण हा इंग्रजी चा अट्टाहास का ? कशासाठी ?🤔

मी मान्य करते की इंग्रजी ही काळाची गरज आहे, आपली जास्तित जास्त जनसंख्या ही विदेशी कंपनी मध्ये काम करते अथवा त्यांना सेवा पुरवते, त्यामुळे इंग्रजी मध्ये प्रावीण्य हवेच, पण ती हवी तिथे वापरा ना. आता तर आपण जी मराठी बोलतो त्यात सुद्धा इंग्रजी शब्दांची रेलचेल असते. खुप शब्दांना मराठी मध्ये काय म्हणतात हे आपण विसरलो आहोत.🤐😵

काही लोक आगदी दुधवाल्या, भाजीवाल्या काकांना इंग्रजी मध्ये बोलतात. एकदा सिमरण (नाव बदलले आहे) म्हणत होती, “दुधवाले भैया ऐका, यू आर ॲडिंग टू मच वॉटर टू द मिल्क,” .😰😬 तो बिचारा काही न बोलता गेला असे दोन ते तीन वेळेस झाले. मग मला सिमरन बाईंनाच बोलावे लागले, “आग ढमे!!! मराठी मध्ये बोल ना”. 😅 आस ही, ही ढमी अर्धी मराठी आणि अर्धी इंग्लिश बोलते, मैंग्लिशच म्हना की. 🤪 उगाच नको तिथे फुशारकी कशाला? काही लोक पाव भाजी चा गाडा ,पाणीपुरी वाला, छोट्याश्या धाब्यावरिल वेटर, हयांच्याशी काय हवे काय नको अथवा त्यांचे काही चुकले तर इंग्रजी मध्ये डोके लावतात, ते बिचारे यांची बड़बड ऐकुण पार घाबरुन ज़ातात. 😱🥶 तुम्हाला स्थानिक भाषा येत नसेल तर वेगळी गोष्ट. पण येत आसेल तर सोडा ना तुमचे स्टैंडर्ड जरा बाजुला आणि बोला की मराठी मध्ये, त्यात काही कमीपणा नाही. 😶🤗

उगाच मराठी दिना च्या दिवशी “लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी” आणि “मी मराठी” गाण्याच्या ४ ओळी व्हॉट्सॲप च्या स्टेटस वर टाकुन कौतुक दाखऊ नका. मला वाटते लेख जास्तच गंभीर होत चालला आहे. आता पूर्णविराम लावते. 😀 मला माझ्या एका मित्रा चे शब्द आठवतात, 🤠 “शांत गदाधारी भीम शांत”. 🤠 पटले तर वाचा नाहीतर गेले गंगे ला .🙃🙃

(टीप – कोणाच्या ही स्टैंडर्ड भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमस्व. काही शब्द मराठी आणि मधेच इंग्लिश बोलायच्या चुका आम्ही पण करतो. )🙏🙏

जय महाराष्ट्र !! जय मराठी !! 🚩🚩🚩

कुचकट कलाश्री.

Leave a Comment