शाळेत निकालाचा दिवस म्हणजे काहींना पाठीवर थाप आणि काहींच्या डोक्याला ताप.
जसा निकाल हातात पडतो, काही नाखुश आसतात तर काही उड्या मारत पेढे वाटत फिरतात.
मला १ गंमत आठवते, मला ईयत्ता १० वी मध्ये ६२ टक्के मिलाळे, मला काही त्याचे फारसे दुःख नव्हते पण आजुबाजूच्यांना ते दुःख जास्त.![]()
![]()
शाळेतुन निघताना १ मैत्रिण खुप दुःखी, तीचे आई बाबा त्याहुन दुःखी. आगदी सूतकी वातावरण , मला टेन्शन च आले, ही मेरिट ची मुलगी आणि रडते आहे, नापास झाली की काय ??
मी विचारलेच , काय ग सिमरन ( नाव बदलले आहे) काय झाले ?? ती आगदी हमसून हमसून रडायला लागली, ती काही बोलेना मग काकुच बोलल्या, आग!! काय सांगु ,इतका अभ्यास केला सिमरन ने, मी सुद्धा तिला १००% वेळ दिला तरी सुद्धा हिला ९१% पडले, अपेक्षा किमान ९५% ची होती.
हिची मोरे मैडम कडे शिकवानी होती, तरीसुद्धा आसे झाले आणि त्या देशमुखांची मुलगी, मोरे मॅडम कडे शिकवानी ला न जाता ही तिला ९७% . संपूर्ण कुटुंबच रडे. मला जरा नवल च वाटले आणि हसायला सुद्धा आले.![]()
![]()
![]()
हे झाले भरपूर मार्क असणाऱ्या माझ्या मैत्रिणीचे. आता जरा माझ्या निकाल कडे वळते,
माझ्या घरात कमी मार्क पडले तर काही रडारड होत नव्हती , हयाचा अर्थ असा नव्हे की आमच्या कडे अभ्यासा चे महत्व नव्हते, पण मुलांवर विनाकारण बर्डन ही टाकले जात नव्हते.![]()
आई बाबा हे नक्की बोलायचे की बेटा थोडी आझुन मेहेनत केली आसती तर आझुन छान मार्क पडले आसते, पुढल्या वेळी जास्त अभ्यास कर आणि भरपूर मार्क मीळव. आई बाबा कधी हे बोलले नाही की तू अभियंता हो अथवा डॉक्टर हो. आई म्हणायची की तुझ्या आंगात इतके कलागुण आहेत की तु आर्ट्स घे आणि नृत्य, नाटक हयात तज्ञ हो आणि बाबा बोलायचे की तुझा आवाज खनखनित आहे, वक्तृत्व चांगले आहे तू तर पत्रकार हो. पण कधी हेच कर अथवा तेच कर अशी जबरदस्ती नाही. ![]()
इतराना आमच्या निकालाचे दुःख जास्तच
ते आई बाबा ना विनाकारण सांगायचे की तुम्ही ख़राब वाटुन घेउ नका, काही मूलांची बुद्धिमत्ता नसते हो चांगली ![]()
![]()
आई बाबा ते गेल्यावर हासुन द्यायचे. त्यांच्या दिव्यांचे टेन्शन ते कमी आणि इतर जास्त घेत होते. ![]()
खरे तर मुलांमध्ये तुलना करु नका. प्रत्येक मुल हे त्याच्या क्षमते नुसार काहीना काही करुन दाखवते. पालकवर्गाणे हे समजायला हवे. तुमचे पाल्य हे कदाचित आभ्यासात हुशार नसेल पण कदाचित त्यात काही असे कलागुण असतील की ते कौतुकास्पद असनारच.
त्याला त्यात पुढे जाऊ देत. पण उगाच त्याला ४ लोकात अपमानित करु नका अथवा त्यांची आपाल्या नातलगांच्या मूलांशी तुलना करु नका. त्याने मुल पुढे जात नाही उलट ते स्वतःला कमी समजायला लागते. ![]()
आशी अनेक उदाहरने आम्ही पाहीली आहेत. मी अशी अनेक मुले पाहीली आहेत जी नापास होती पण आज ती गूगल , माइक्रोसॉफ़्ट सारख्या कंपनीमध्ये मोठया पदावर आहेत ![]()
आणि अशी पण पाहीली जी ९०% आसुन ही काही मोठे करु शकलि नाहित.![]()
हयाचा अर्थ हा नाही की मी जास्त मार्क असणार्यांचा तिरस्कार आणि कमी मार्क असणार्यांचा पुरस्कार करत आहे. स्पर्धा तर हवीच पण तुलना नको . व्यावसायिक क्षेत्रात चांगले मार्क हे महत्वाचे आहेतच पण त्याचे मुलांवर बर्डन नको. हया फुलांना हवे तसे फुलु दया पण फक्त त्यांचि दिशाभूल होत आसेल तर तिथे त्यांना मित्र बनुन मदत करा. ![]()
![]()
![]()
आम्ही आज आमच्या आई बाबांचे आभारी आहोत की त्यांनी आम्हाला कोणताही दबाव न टाकता मित्र बनुन दिशा दाखवली आणि आम्ही सुद्धा आज त्यांचे नाव मोठे केले (१० वी मध्ये ६२% आसुन ही ) ![]()
“डोक्याला ताप करुन घेउ नका, पाठीवर थाप दया!!!”
(टीप- हया लेखाद्वारे मी माझे वैयक्तिक मत व्यक्त केले आहे, कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमस्व
)
कुचकट कलाश्री
See Insights and Ads
All reactions:
340340