मी आणि बाई ![]()
![]()
मी मराठी आणि आमच्या भोपाळच्या बाया हिंदी.
हिंदी ही खरे तर राष्ट्रभाषा, ती बोलता येते ही, पण सतत मराठी बोलण्यामुळे मी हीराठी जास्त बोलते.![]()
माझ्याकडे स्वयंपाक बनवणारी पण हिंदी भाषिक आणि बाळाला सांभाळणारी पण हिंदी भाषिक , त्या दोघिना काही मराठी कळत नाही आणि माझी हीराठी बोलण्याची सवय काही जात नाही.![]()
आम्ही सध्या वर्क फ्रोम होम करत आहोत, सकाळी उठुण बाळाचे पटापटा आवरुण मला कामासाठी बसायचे आसते.
मी भराभरा बाई कडे गेले आणि म्हणाले, दीदी आप मेथी को निवडके ,पेपर मे लपेटो और पिशवी को टोचे मारके ,मेथी उसमे रखदो, आणि गेले भराभरा निघून
ती बिचारी पहातच राहिलि
मग बोलली, क्या ?? ![]()
![]()
तरी माझी हीराठी काही संपत नाही , “अरे काकु, क्या तुम,पन्नी को टोचे मारो चाकू से और रख दो..”
मग कसे बसे समझले तिला.![]()
दुपारि म्हणाली, आज बेबी को क्या खिलाऊ ? मी माझ्या कॉल च्या गडबडीत, तिला म्हणाले जलदी सुनो, वरई बनाओ, उसमे शेंगदाणे का कुट डालो, और मुझे दो, मै माऊ को खिलादुंगी. पहातच राहिलि ती माझ्याकडे,
जरा वेळाने मलाच हसु आले, मग मी तिला माझ्या शेजारी बसविले आणि सांगितले,
वरई मतलब मोरधन, शेंगदाणे मतलब मूँगफल्ली.
मै शेंगदाणे बोलु तो अगली बार समझलो.
जब मै बोलु दूधी भोपळा तो लौकी समजलो और लालभोपळा बोलु तो कद्दू समझो. ![]()
शेपु बोलु तो सुवा और तोंडले बोलु तो कुंदरु समझलो.![]()
हे झाले आमच्या बाळाच्या बाई चे. आता गम्मत सांगते आमच्या स्वयंपाकीण बाई ची. तिला तुम्ही काहीपण बोला तिच्याकडे एकच उत्तर आसते, “आपने ही तो बोला था!”
आता हा खालचा संवाद वाचा,
मी – दीदी, आज क्या बनाओगी.
दीदी – आप बताओ.
मी – दीदी, कल दाल मे कोथिंबिर क्यु नाही डाली?
दीदी – आप ने कहा बोला था ?
मी – दीदी, आज राजमा बना दोगी ?
दीदी – आप जैसे बोल दो.
मी – दीदी , कल १ ही सब्ज़ी बनाई
दीदी – आप की आई ने बोला था.
मी – दीदी सब्ज़ी मे मिर्ची नही थी
दीदी – बुवा ने बोला था
मी – दीदी रोटी को ज़्यादा घी मत लगाओ
दीदी – आप की मर्ज़ी
मी – दीदी रविवार को छोले भटुरे बनाओगे
दीदी- आप बताओ
मी – दीदी भटुरे मे रवा डालोगे ?
दीदी – जैसे आप बताओ
आग बाई तुझ्या रेसिपी ने बनव ग माते!!!![]()
![]()
![]()
तर मग अशी आहे आमच्या बाई ची मज्जा![]()
![]()
कुचकट कलाश्री![]()