नरक चतुर्दशी च्या दिवशी अभ्यंग स्नान केले जाते.
“का बर अभ्यंगासाठी लवकर उठायचे, सुट्टी आहे ना राव मस्त रात्र भर मूवी पाहु किंवा जोपर्येंत डोळयातुन पाणि येत नाही तोपर्येंत मोबाइल मध्ये पाहु आणि सकाळी लेट उठुन फराळ खाऊ”.![]()
नाही ना!!! आई च्या सो कॉल्ड बाळांनो किंवा गोडुल्या मुलीनो. ![]()
तुम्ही म्हणाल “हे काय डोक्याला शॉट, एक दिवस तेल, उटणे लाउण आँघोळ केली तर काही मी गोरागोमटा होणार का ?”![]()
ऐक्चूअली काय ना तुम्ही गोरेगोमटे दिसण्यासाठी नाही ना अभ्यंग.![]()
1) जे लोक देवाला मानतात त्यांच्या साठी –![]()
![]()
नरकचतुर्दशी या दिवशी पहाटे भगवान कृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला. नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला की जो कुणी या दिवशी सकाळी मंगलस्नान करेल त्याला नरकाची बाधा होऊ नये. कृष्णाने त्याला वर दिला. त्यानुसार नरकात जाण्यापासून मानवाला वाचविणारे पवित्र आणि मंगल स्नान या दिवशी पहाटे करण्याची पद्धती प्रचलित आहे.![]()
![]()
2)जे लोक देवाला मानत नाहित आणि नेहमी तर्कशुद्ध; विज्ञाननिष्ठ, शास्त्रशुद्ध उत्तर शोधातात –![]()
![]()
![]()
![]()
शरीराची कांती तजेलदार व्हावी, स्नायू बलवान आणि पुष्ट व्हावेत यासाठी हे स्नान केले जाते.आरोग्याची वाढ होणे हा याचा प्रमुख हेतू मानला जातो.तिळाचे तेल हे हाडांच्या आरोग्यासाठी आणि त्याना बळकटी देण्यासाठी उपयुक्त असते. उटणे लावून स्नान केल्याने हिवाळ्यात कोरडे पडत असलेली त्वचा मऊ राहते.
अभ्यंगस्नान हे केवळ दिवाळीच्या दिवशी करू नये तर त्या दिवसापासून सुरुवात करून ते वर्षभर रोज करावे असे आयुर्वेदाचे अभ्यासक सांगतात.![]()
![]()
3) आता जे लोक आळशी आहेत आणि त्यांना वरिल दोन्ही विचारांचे महत्व पटत नाही –
मुर्खानो
अरे वर्षातुन १ दिवस तुमच्या कडुण लवकर उठण्याची अपेक्षा केली जाते आणि ते ही आयते पाटावर बसुन गंध लाउन देवा सारखे तेल आणि उटणे लाउन तुमचा मसाज केला जातो. ![]()
![]()
![]()
उगाच घरच्यांणा महागडे दिवाळी हैम्पर गिफ्ट करण्या पेक्षा लवकर उठुण घरच्यांना धक्का दया. हेच मोठे गिफ्ट आहे. ![]()
![]()
![]()
धन्यवाद,
कलाश्री औंधकर रावेरकर